अंबरनाथ मध्ये 45 वयोगटा पुढील नागरिकांना कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण मोहिम सुरु – बालाजी किणीकर

0 81

अंबरनाथ, प्रतिनिधी – अंबरनाथ येथील कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय येथे 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांकरीता लसीकरण मोहिमेची सुरुवात आज शुक्रवार दि.7 मे 2021 रोजी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

सदरवेळी कोविड लसीकरणाकरिता आलेल्या जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आमदार डॉ. किणीकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक तथा युवासेना विस्तारक ऍड. निखिल वाळेकर, माजी नगरसेवक उमर इंजिनिअर, छाया उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ.शशिकांत दोडे, डॉ. शुभांगी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!