आमदार राजेश पवार व सौ पुनम ताई पवार यांची धर्माबाद कोव्हीड सेंटरला भेट

0 148

संशयितांची आस्थेवाईकपणे केली चौकशी! दोन दिवसात 42 संशयितांचा स्वाब तपासणीसाठी पाठवला                              
नायगाव – नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्य सौ पुनमताई पवार यांनी धर्माबाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या    कोव्हीड  सेंटरला म्हणजेच माहेश्वरी भवनात आज आकस्मिकपणे भेट देऊन covid-19 संशयित रुग्णांची अतिशय आस्थेवाईकपणे चौकशी करीत त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा संदर्भात जाणून घेत आपली पालकत्वाची जागरूक जवाबदारी सिद्ध केली .आतापर्यंत म्हणजेत गेल्या चार महिन्यापासून धर्माबाद चा कोरोना बाधित एकही रुग्ण नव्हता पण काल एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यासह त्यांच्या कौटुंबिक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले व धर्माबाद शहरच नव्हे तर अख्खा तालुका हादरला होता. काल प्रशासनाची तातडीने बैठक होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा कृती आराखडा तयार होऊन शंकर गंज नजीकच्या गुलमोहर कॉलनी सील करण्यात आली होती .व  करून कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्याना कोरनटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत जवळपास 42 जणांना कोरंनटाईन करून त्यांचा स्वाॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला.

उपरोक्त पृष्ठभूमीवर कोरोणा संशयिताचे मनोधैर्य वाढवून त्यांच्या समस्या व त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा कशा आहेत याबाबत आमदार राजेश पवार हे आपल्या मतदारसंघात भेटी देत आहेत आज ह्या भेटीदरम्यान तहसीलदार दत्तात्रय शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इक्बाल शेख ,डॉक्टर  लक्ष्मीनारायण केशटवार, मंडळ अधिकारी माळोदे ,तलाठी सहदेव बासरे ,आमदार समर्थक यांच्या सह आरोग्य व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर यांनी घोषित केलेल्या संचारबंदी आदेशाचे नागरिकांनी पालन करावे व अनावश्यक घराबाहेर पडू नये ,प्रशासकीय सूचनाचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.

पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर म्हणजे सरकारी कार्यालय नव्हे’, हे अधिकार्‍यांनी लक्षात ठेवावे !



error: Content is protected !!