ओझर गावातील मुंबई आग्रा हायवेवर होत असलेल्या उड्डाणपूलाखाली पादचारी रस्ता करण्याची मागणी

2 197

 

 

निफाड, राहुल खाडे – ओझर मधील पंचशील नगर, गाडेकर वाडी, कडाळे वस्ती, महादेव मठ, गाडेकर मळा, मंडलिक मळा, कदम मळा, शिंदे मळा, ओझर गावातील रहिवासी यांच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावर होत असलेल्या उड्डाणपुला खाली नागरिकांना गावात येणे जाण्यासाठी पादचारी रस्ता तयार करून द्यावा  अशी मागणी निवेदनाद्वारे एन एच ए आय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. सदर फुल झाल्यास वयोवृद्ध, शाळेचे मुले मुली, कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शेतकरी मजूर, महिला पेशंट गरोदर महिला, अंत्यविधीसाठी जाणारे नागरिक कुठुन जाणार या सर्व बाबीचा विचार केला नाही .गडाख कॉर्नर वरून रस्ता लांब पडत आहे. भविष्य मोठे अपघात होऊ शकतात. त्यासाठी लोक वयोवृद्ध पेशंट अंत्यविधीसाठी कुठे जाणार याचा विचार करावा अशी मागणी प्रकाश महाले, शब्बीर खाटीक,वसंत वाघमारे, योगेश सोनोने, पांडुरंग जाधव, गणेश अत्रे, संतोष सोनवणे, रवी चाफळकर, आशिष आंबोरे, सुनीता विश्वकर्मा मायकल ससाने आधी ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!