गुन्हे शाखेच्या पथकाकडून देशी-विदेश दारू जप्त
हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – शहरात एका दारू विक्रेत्याकडून पन्नास हजाराची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आलेली आहे.
हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात पेट्रोलिंगचे दरम्यान माहिती मिळाली असता संत कबीर वार्ड येथील विशाल सातघरे यांचे घरी देशी व विदेशी दारूचा साठा ठेवून असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशाल सातघरे यांच्या घरी झडती घेतली असता विदेशी दारू च्या 90 शिष्य व देशी दारूच्या 192 शिष्य असा एकूण 50 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. परंतु या झडती च्या वेळेस आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. हा न देशी-विदेशी दारुचा साठा हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये आणून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडेवार यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शेखर डोंगरे निलेश एरंडे सचिन घेवंदे विलास बंगाली सचिन भारशंकर यांनी केली आहे.