जिनिंग बंद : दोन हजार शेतकऱ्यांचा कापूस पडून घरातील कापूस पंचनाम्याला माजलगांव तालुक्यात सुरुवात
माजलगांव ,प्रतिनिधी:- लॉकडाऊन आणि वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे . त्यामुळे या कापसाचे बाजार समितीच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे .
माजलगांव तालुका हा कापसाचे भांडार म्हणून ओळखला जातो . तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास ४० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते . मागील वर्षी कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले होते .
खाजगी कापूस खरेदी केंद्रावर अत्यंत कमी भाव मिळत असल्याने तसेच शासकीय कापूस खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने आणि चालू झाल्यानंतरही ते अचानक १५-१५ दिवस बंद ठेवण्यात येत होते .
निम्म्याच शेतकऱ्यांनी आपला कापूस घातला . कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन झाले , त्यामुळे दीड महिना कापूस खरेदी केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या . मे महिन्यात कसेतरी कापुस खरेदी केंद्र सुरू झाले.
व यात थोड्याफार शेतकऱ्यांचा कापूस गेला तोच मान्सूनपुर्व पावसाला सुरुवात झाल्याने जिनींग मालकांनी आपल्या जिनिंग बंद ठेवल्याने व पुढे पाऊस सुरूच राहिल्याने जवळपास अगोदर नोंद करणाऱ्या १ हजार ३०० शेतकऱ्यांचा कापूस घरातच राहिला .
जून महिन्यात अचानक ९ ०० लोकांनी आपली नोंदणी केल्याने जवळपास २ हजार शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहिला पाठीमागण नोंद करणारे आल्याने शेतकरी नसून व्यापारी आहेत , अशा तक्रारी व यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाची मापे होणे मुश्कील झाले होते . त्यात पाऊस पडल्याने जिनिंग बंद झाल्या व कापूस घरातच पडुन राहिला.
अनेकांच्या बोगस नोंदी उघड
• बाजार समितीने बुधवारपासून १२ कर्मचाऱ्यांमार्फत ज्यांचा कापूस शिल्लक आहे त्याचे पंचनामे सुरु केले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव हरिभाऊ सवणे यांनी दिली .
• या पंचनाम्यात कापूस कोणाच्या नावे आहे व नोंद कोणाची आहे हे पाहिले जात आहे . यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .
अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा जोडून आपल्या कापसाच्या नोंदी केल्या होत्या . परंतु पंचनामा सुरु असल्याने ज्या शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे त्या शेतकऱ्याच्या घरात कापूस दिसून आला नाही तर शेतकऱ्यांच्या नावे नोंद व मोबाईल नंबर दुसऱ्याच्या नावे असल्याचे दिसून आल्याचे पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले .
अभिनेत्री दिप्ती देवीला तिच्या योगागुरू रीमा वेंगुर्लेकरने काढलं नैराश्यामधून
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});