नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने पुण्यात ३५० कोरोना योद्ध्यांना जॅकेट वाटप

1 174

पुणे, प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह उपक्रमा अंतर्गत पुणे महापालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने पुणे शहर संघटन सरचिटणीस श्री.राजेशजी पांडे यांच्या शुभहस्ते ३५० कोरोना योद्ध्यांना (सफाई कर्मचारी) जॅकेट वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात सर्वत्र सुमारे १००० विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन या सेवासप्ताह उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवले गेल्याची माहिती यावेळी श्री.राजेशजी पांडे यांनी दिली.

यावेळी कोरोना संकट काळात अहोरात्र मेहनत करणार्या हे सफाई कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता नागरीकांच्या आरोग्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्या या सफाई कर्मचार्यांना नविन ओळख मिळवुन देवुन यासर्वांना “आरोग्य योद्धा” संबोधन्याचे आवाहन यावेळी शहर सुधारणा समिती अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले.

यावेळी नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत बालवडकर, सुंदरशेठ बालवडकर, स्विकृत नगरसेवक सचिनजी पाषाणकर, कोथरुड भाजप यु.मो.उपाध्यक्ष कृष्णा बालवडकर, प्रल्हादजी सायकर, वैभव बालवडकर, सुमित कांबळे, प्रतिक बालवडकर, रोनक गोटे, आरोग्य निरीक्षक जालिंदर चांदगुडे, आरोग्य निरीक्षक नितिन लोखंडे, आरोग्य निरीक्षक जया सांगडे, प्रभागातील सर्व कोरोनायोद्धे (सफाई कर्मचारी) व नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!