पहिल्यांदाच ऑनलाईन विद्यार्थी संवाद कान्क्लेव्ह संपन्न
औरंगाबाद , प्रतिनिधी: कोविड१९ या जागतिक महामारीने अखंड जग ग्रासले आहे. सर्वच क्षेत्रात याचे गंभिर पडसाद उमटले आहे.या परिस्थीतीशी जो तो आपल्या परिने मुकाबला करत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात तर या कोविड१९ चा खुप सखोल परिणाम पडला आहे. शैक्षणिक धोरण पुर्णपणे कोलमडले आहे. शाळा-महाविद्यालये तसेच विद्यापिठ या दरम्यान पुर्णपणे बंद आहेत.तरि ऑनलाईन शिकवणी वर्ग चालू केले गेले आहे. परिक्षा या होणार कि नाही यावर राजकारण तापले आहे.
विद्यार्थ्यांना या कठिण परिस्थीतीत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.अभ्यास, ताण तणाव व परिक्षेबाबत अनभिज्ञता पाहता विद्यार्थी गांगारुन गेला आहे.
अशा या कठिण काळात विद्यार्थ्यांना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी
मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने campuskatta.com या वेब पोर्टलने पुढाकार घेत पहिल्यांदाच ऑनलाईन “विद्यार्थी संवाद कान्क्लेव्ह”चे आयोजन २५ मे २०२० ते ४ मे २०२० दरम्यान केले होते.
रोज सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दररोज एक विद्यार्थी संघटनेचे प्रमुख campuskatta.com च्या फेसबुक पेजला ऑनलाईन येत. या कान्क्लेव्हमध्ये शहरातील विविध राजकिय विद्यार्थी संघटनांचे प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते.या पहिल्या वहिल्या कान्क्लेव्ह चा विषय होता ” अगामी विद्यार्यांच्या शैक्षणिक समस्या व उपाय ” .
या कान्क्लेव्हमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काग्रेसचे मयुर सोनवणे यांनी कान्क्लेव्हचे उद्घाटन ऑनलाईन केले. तद्नंतर समता विद्यार्थी आघाडीचे विशाल साळवे, एमआयआम विद्यार्थी आघाडीचे मराठवाठा अध्यक्ष मझहर पठाण, महाराष्ट्र् नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर महामंत्री तुषार साळूंखे, स्टुडंट फेडरेशन आफ इंडियाची विद्यापीठ प्रमुख मोनाली अवसरमल, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ, एनएसयुआयचे शहराध्यक्ष मोहित जाधव , रयत संकल्प बि.एड डि.एड संघटनेचे परमेश्वर इंगोले व समारोप भारतीय जनता पार्टि विद्यार्थी आघाडीचे राहुल नरोटे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या दरम्यान काहि तांत्रिक जसे कि नेटवर्क,विजेची अनियमितता अडचणींमुळे सचिन निकम, परमेश्वर इंगोले,तुकाराम सराफ व राहुल नरोटे यांना सहभागी नाही होता आले.
या कान्क्लेव्हच्या उद्घाटन संवाद साधताना मयुर सोनवणे यांनी कोविड१९ आजारात संघटनेने केलेले कार्य विशेष अर्सेनिक या होमिओपॅथिक औषधीचे वाटप , पर राज्यातून अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणने, शहरात अडकलेल्या विद्यार्यांना घरापर्यंत पोहचविणे व शासनाला या बाबत अवगत करण्याचे काम केल्याचे सांगितले.
दुसर्या दिवशी समता विद्यार्थी आघाडीचे विशाल साळवे यांनी शिक्षण क्षेत्रात होणार्या संस्थात्मक हत्यांवर प्रकाश टाकला.यात त्यांनी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न गरजेचे असल्याचे सांगितले.
तिसर्या दिवशी एमआयआम विद्यार्थी आघाडीचे मझहर पठाण यांनी विविध शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच campuskatta.com च्या वतीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी स्पर्धात टिकण्यात परिक्षा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.त्यांनी एनआरसी,जामिया,शाहिन बाग या मुद्यांवर एकमत होणे गरजेचे सांगितले.
मनविसेचे संकेत शेटे यांनी सांगितले कि शिष्यवृत्ती व विविध शासकिय योजना विद्यार्थींना लवकरात मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
अभाविपचे तुषार सोळूंके यांनी परिक्षा होणे का गरजेचे आहे त्याचे महत्व विशद केले.तसेच गुणवत्तापुर्ण शिक्षण व परिक्षा पद्धतीत अमुलाग्र बदल करण्याचे सांगितले.
स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची मोनाली अवसरमल यांनी सध्याच्या ऑनलाईन शिक्षणप्रणाली जी रुजत आहे यावर बोट ठेवत ग्रामिण भागातील विद्यार्थींना विज, इंटरनेट डाटा, नेटवर्कच्या अडचणी याबाबत होणार्या व्यत्ययामूळे विद्यार्थींसाठी ही शिक्षण पद्धती उपयुक्त ठरणार नाही असे सांगितले.
या कान्क्लेव्हचे आयोजन आयोजन करत पहिल्यांदाच शहरातील सर्व विद्यार्थी संघटनांचे प्रमुख यांना एका मंचावर आणत विद्यार्दथ्यांना मार्गदर्शन होईल असे केले.
campuskatta.com पोर्टलचे संपादक डा.सुनिल बाबुलाल राजपुत यांच्या या संकल्पनेला मुर्तरुप देण्याचे काम कॅम्पसकट्टाच्या टिमने केले. या पोर्टलवर महाविद्यालय,विद्यापिठाच्या व शैक्षणिक घडामोडींवरिल बातम्या प्रसारित होतात.
या कान्क्लेव्हच्या यशस्वीतेसाठी कॅम्पसकट्टा टिमचे काजल राजपुत, शंकर साबळे, भरतसिंग राजपुत आदींनी परिश्रम घेतले.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});