फुटपाथच्या बाजूचा खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

2 112

 

बदलापूर, वार्ताहर – बदलापूर कर्जत या मुख्य रस्त्यावर माल प्लाझा हौसिंग सोसायटी आहे. सदर इमारत ही मुख्य रस्त्याच्या बाजूला असून या इमारती समोरून जाणाऱ्या फुटपाथच्या जवळ  इमारतीचे बेसमेंट  आहे. नवीन सिमेंट रस्ता झाल्यामुळे सदर रस्ता काही प्रमाणात उंच झाल्यामुळे फुटपाथ व बेसमेंट मधील अंतर सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात रूपांतरित झाले आहे. तसेच ह्या फुटपाथवरून  नागरिकांची मोठ्या प्रमाणात येणे- जाणेची वर्दळ असते. व  कर्जत – बदलापूर  वाहतूक रोड असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लहान – मोठ्या वाहनांची वर्दळ असते. भविष्यात येथे अपघात घडण्याची शक्यता आहे.

सोसायटीने आतील बाजूने लोखंडी ग्रील लावून घेतले आहे. पण मुख्य रस्त्याकडील बाजूने कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने १२ फूट खोल धोकादायक  दरी / खड्डा असुरक्षित आहे. सदर फूट पाथवरून नेहमी नागरिकांची वर्दळ असते. यापूर्वी एक इसम या खड्यात पडून मृत पावला आहे.

याबाबत सोसायटीकडून नगरपालिकेला वेळोवेळी विनंती केली आहे, पण कोणतीही सुविधा पालिकेने केलेली नाही. आणि हीच गंभीर बाब आहे. फुटपाथच्या बाजूने संरक्षक भिंत किंवा लोखंडी ग्रील लावणे आवश्यक आहे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. पण स्थानिक नगरसेवक आणि पालिका प्रशासन याकढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा नाहक बळी गेला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन लक्ष घालणार का ? असा संतप्त सवाल येथील स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!