भारती विद्यापीठ आयएमइडी मध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार
पुणे,प्रतिनिधी – भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) मध्ये ‘नो लॉक डाऊन इन लर्निंग’ तसेच ‘डिजिटल मार्केटिंग स्ट्रटेजीस ‘ या विषयावर दोन आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते .
डॉ. सचिन वेर्णेकर ,एम आर चाहार(सौदी अरेबिया ),सतीश पाटील (अत्याशा ग्लोबल अलायन्सेस ),सैद गौस (आदित्य बिर्ला कॅपिटल ) हे ‘नो लॉक डाऊन इन लर्निंग’ या वेबिनार मध्ये सहभागी झाले. ‘डिजिटल मार्केटिंग स्ट्रटेजीस ‘ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये ‘लंडन स्कूल ऑफ डिजिटल बिझनेस ‘ चे संचालक सचिन पारेख यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. सचिन वेर्णेकर(संचालक ,भारती विद्यापीठ ,’इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हे वेबिनार उत्साहात पार पडले.