शिवसेना वर्धापनदिन आणि आदित्य ठाकरे वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई ,प्रतिनिधी – विक्रोळी विधानसभा युवा सेना तसेच भारतीय विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त आयोजनातून शिवसेना वर्धापन दिन (19 जून ) आणि युवासेनाप्रमुख ,शिवसेना नेते, पर्यावरण -पर्यटन व राजशिष्टचार मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमा अंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विक्रोळी टागोर नगर येथील विजय आश्रम मधील जेष्ठ नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप , विक्रोळी विधान सभेतील पोलीस भगिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप , कॉरंटाईन सेंटर मधील नागरिकांना मिनरल पाण्याचे वाटप, याच विभागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम व युवा सेना निर्मित मास्कचे वाटप त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील आदीवासी पाड्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
या संपूर्ण सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन -नियोजन योगेश पेडणेकर ( सहसचिव -युवा सेना ), विजय कुरकुटे ( विभाग युवा अधिकारी ), निलेश पोहकर (वि. संघटक , भा .वि से .), प्राजक्ता नाईक ( युवती विभाग अधिकारी ) यांच्या सहकार्य व समन्वयातून केलेले आहे.
खेळण्याच्या मैदानावर अतिक्रमणाचे सावट
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});