सेलू बसस्थानकातून ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

आगार प्रमुख यांना दिले निवेदन

1 106

 

 

सेलू, प्रतिनिधी – सेलू तालुक्यातील बहुतांश ठिकाणच्या बसफेर्या अजून सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच मानव विकास मिशनच्या बसेस अजून सुरू झाल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बंद असलेल्या बस्फेर्या त्वरित  सुरू करण्यात याव्यात.  मानव विकास मिशनच्या सर्व बसेस ताबडतोब सुरू करण्यात याव्यात. बसस्थानक परिसरातील शौचालय स्वच्छ ठेवण्यात यावे. बसस्थानक परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रकार दिवसादिवस वाढत आहेत. याचा बंदोबस्त करण्यासाठी बसस्थानक परिसरात एक पोलीस कर्मचारी देण्यात यावा. आदि मागणीचे निवेदन 8 फेब्रुवारी मंगळवार रोजी सेलू आगार प्रमुख बोराडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

pune lok1

वरील मागण्यांवर येत्या ४-५ दिवसात विचार केला गेला नाही तर  श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूच्या वतीने विद्यार्थ्यांसोबत तिव्र आंदोलन  छेडण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

shabdraj reporter add

निवेदनावर श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष  जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, माणिक शेळके, हर्षल देशमुख, बाबा शेळके, पांडुरंग सावंत, बलवंत शेळके, गणेश सोळंके, संतोष बेलापूरे, महेश जाधव, प्रध्यूम्न शेळके व विद्यार्थी आदींचे स्वाक्षर्‍या आहेत

error: Content is protected !!