महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा,पहा कुठे आहे भरती

0 110

मुंबई, 18 मार्च: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती
सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

एकूण जागा – 02

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी. एन. बी किंवा एम. एस.) असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 

मुलाखतीचा पत्ता

अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022, यांच्या दालनात

इतका मिळणार पगार

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

 

error: Content is protected !!