महाराष्ट्राच्या गतका खेळाडूंची राष्ट्रिय स्पर्धेमध्ये 13 पदकाची कमाई

0 56

पंजाबमध्ये 13 पदके जिंकून गतकापटूंनी आपल्या राज्याचे नाव उंचावले आहे. माता साहिब कौर गर्ल्स कॉलेज तलबंडी साबो भटिंडा (पंजाब) येथे 19 ते 21 जानेवारी दरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र (मुली) गतका खेळाडूंनी 13 कांस्य पदके जिंकली.

 

 

गतका असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस अंभूरे पांडूरंग म्हणाले की, 10 वी राष्ट्रीय मुलींच्या गतका स्पर्धा माता साहिब कौर गर्ल्स कॉलेज तलबंडी साबो भटिंडा (पंजाब) येथे 19 ते 21 जानेवारी रोजी पार पडल्या या स्पर्धेमध्ये 17 राज्यांनी व 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये महाराष्ट्राला सब ज्युनिअर ,ज्युनियर व सीनियर मध्ये सिंगल शोटी मध्ये, फरी शोटी मध्ये 13 पथकाची कमाई करत महाराष्ट्राचे नाव पंजाब राज्यामध्ये मध्ये केले आहे.

 

 

सब ज्युनिअर मुली ,ऋतुजा बनसोडे, दिव्या घोडके, हर्षा वलेच्या, प्रज्ञा पद्मावत, ज्युनिअर मुली गायत्री वकोडिकर, सीमा खीस्ते, निकिता वैद्य, मानशी कोल्हे, विजयालक्ष्मी पिंपरीकर आणि सीनिअर मुली सृष्टी अंभुरे, आश्र्विनी देवकर, श्रद्धा घोडे या सर्व खेळाडूंना मास्टर पांडूरंग अंभुरे यांचे मार्गदर्शन लाभले.. विजय खेळाडूचे अभिनंदन. नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष हर्जित सिंग गरेवाल, सदस्य.बलजीत सिंग सनी , अजितदादा वरपूडकर ,विकी नारवानी, मंदार कुलकर्णी , पंकज सोनी ,विश्वनाथ तिखे,दत्ता गरुड, सूर्यकांत मोगल, सुरेश कदम ,रमेश शिर्के इत्यादींनी केले.

error: Content is protected !!