नायगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न
पुरंदर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे मंडल कृषी अधिकारी कार्यालय पिसर्वें व श्री सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय माजी आमदार चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.
दिवसभरात ३१ जणांनी रक्तदान केले.रेड प्लस ब्लड बँक पुणे यांच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दवाखान्यांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मंडल कृषी अधिकारी दयानंद बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी मंडल कृषी अधिकारी दयानंद बनसोडे,अमर मोहिते,देविदास लोणकर,उदयंत वाघोले,सचिन जगताप,किरण हरपळे,विजय गोफने,व रेड प्लस बँकेच्या डॉ दिपचंद राजहंस,कमलेश पाटसकर,शीतल शहा,शामबाला गायकवाड,मंदकिशोर गुप्ता यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्रामपंचायत नायगाव, सेवाभावी संस्था व तरुण मंडळानी मदत केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे,सरपंच दिपाली जगताप,उपसरपंच किशोर खळदकर,प्रकाश कड,विलास खेसे,बाळासाहेब कड,संपत कड,मारुती पाटोळे,रोहिदास कड,संदिप खेसे,दत्ता कड,रोहिदास कड,चंद्रकांत चौंडकर,प्रवीण जगताप,संतोष गायकवाड,संदीप ठवाळ,राहुल कड,अनिल शेंडगे आदी उपस्थित होते.