बोरी (बु) येथील महादेव मंदिर विकासासाठी २१ कोटीचा निधी मंजूर – खा. चिखलीकर यांची माहीती

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न ..

0 53

कंधार,दि 14 (प्रतिनिधी)ः
केंद्रीय पर्यटन मंत्रालय कडून तीर्थक्षेत्र विकास निधीतून कंधार तालुक्यातील बोरी ( बु ) येथील महादेव मंदिरच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटीचा निधी मंजुरी झाला असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

कंधार तालुक्यातील बोरी ( बु ) येथे  नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ( घुगे ), उपविभागीय अधिकारी शरद मांडलीक, उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की केंद्रीय पर्यटन विकास मंत्री किशन रेड्डी यांनी नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी ६६ कोटीचा निधी मंजुर केला आहे. त्यात कंधार तालुक्यातील बोरी ( बु) येथील महादेव मंदिराच्या विकासासाठी २१कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच शासनाकडे २१ लाखांच्या आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
बोरी(बु) येथील महादेव मंदिर विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. तसेच मतदार संघात रस्ते व समशानभूमी ची रखडलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येईल. कै.विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात लिंबोटी धरणाचे काम व रस्त्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात आणण्यात यश आले. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळात महादेव मंदिर चा विकास झाला.तसेच रस्त्याचे मतदार संघात मोठ्या प्रमाणात कामे झाली. बळीराजा मंदिराचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. महादेव मंदिर परिसरातील मन्याड नदीत बोटिंग चे रखडले काम पूर्ण करण्यात येईल. सामान्य जनतेच्या प्रेमामुळे महादेवाच्या आशीर्वादाने मी जनतेची सेवा करत आहे असे ही खा.चिखलीकर म्हणाले.कार्यक्रमाला भाजपच्या महिला आघाडीचे अध्यक्ष चित्ररेखा गोरे,भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड, मुखेड कृषी बाजार समिती चे सभापती खुशाल पाटील उमरदरीकर, अधीक्षक अभियंता जाधव, तहसीलदार संतोष कामठेकर, सचिन पाटील चिखलीकर, पोलीस निरीक्षक पडवळ, उपविभागीय अभियंता जोशी, , माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, राजहंस शाहापुरे, गट विकास अधिकारी मांजरमकर, डिझायनर संगीता जोशी, उपसरपंच माधुरी सांगवे, शिवाजी मुंडे यांची उपस्तीती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरीचे सरपंच बालाजी झुंबाड यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य किशन डफडे तर आभार देवानंद सांगवे यांनी मानले.

error: Content is protected !!