डांबर प्लँटमुळे शेती पिकाचे ३१ लाखाचे नुकसान; शेतकऱ्याचे आमरण उपोषण

0 224

 

 

सेलू, प्रतिनिधी – तालुक्यातील आडगाव दराडे येथे असलेल्या डांबर प्लॅन्ट मुळे लगत असलेल्या शेतकऱ्याचे शेती पिकाचे ३१ लाख रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने दि १७ पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे.

 

 

तांदुळवाडी येथील रहिवाशी सुदाम गोविंदराव जाधव यांची आडगाव दराडे येथे सर्व्हे क्रमांक १४२ मध्ये १५ एकर शेती आहे .व त्यांच्या लगतच्या सर्व्हे क्रमांक १४१ मध्ये कल्याण टूल कंपनी ने डांबर प्लँट उभारलेला आहे .या प्लँट मधून निघणाऱ्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होत असून आतापर्यंत ३१ लाख ६५ हजार रुपयांचे शेतमालाचे नुकसान झाले हवं.यामध्ये सन २०२०-२१ मध्ये ५ एकर केळी पिकाचे १८ लाख ,सन २०२१-२२ मध्ये ३ एकर ऊस पिकाचे ३ लाख २५ हजार ,तर सन २०२२-२३ मध्ये ५ एकर मधील कांदा बियाणे व उन्हाळी मिरची चे १० लाख ४० हजाराचे नुकसान झालेले आहे .तरी पुढील नुकसान टाळण्यासाठी व आरोग्यास बाधा होऊ नये यासाठी हा प्लँट इतरत्र हलवावा .व माझी झालेली नुकसान भरपाई मिळावी तसेच या प्लँट साठी दिलेल्या परवानगी परवाना ची प्रत मिळावी असे निवेदन सुदाम जाधव यांनी ४ ऑक्टोम्बर रोजी उप -प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ ,परभणी यांच्या कडे दिले होते .व याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही न झाल्यास १७ पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता .त्यांच्या निवेदनावर मुदतीत काहींच कार्यवाही संबंधित अधिकाऱ्याकडून न झाल्यामुळे सुदाम गोविंदराव जाधव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे .

error: Content is protected !!