अशा प्रकारे बदलू शकता आधार कार्डवरील फोटो

0 66

आधार क्रमांक हा देशातील कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जारी केला जातो. ज्यात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो सोबत त्याची बायोमेट्रिक माहिती सुद्धा असते. तुम्हाला जर आधार कार्डवरचा फोटो आवडत नसेल, तर तुम्ही तो आता सहज बदलू शकता. आधार क्रमांक जारी करणे आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ला सोपवण्यात आली आहे.

pune lokseva

 
नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी UIDAI फक्त ऑफलाइन सुविधा पुरवते. हे ऑनलाइन आणि पोस्ट द्वारे केले जाऊ शकत नाही. सोप्या शब्दात, जेव्हा नावनोंदणी केंद्रावर एखादी व्यक्ती जात असेल तेव्हाच फोटो अपडेट करता येईल. फोटोमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नावनोंदणी केंद्रात जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम देखील करू शकता.

अशा प्रकारे बदलू शकता आधार कार्डवरील फोटो

  • UIDAI ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावे लागेल आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर हा आधार नावनोंदणी फॉर्म भरुन तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जमा करावा लागेल.
  • आता आधार नोंदणी केंद्रात कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक तपशील घेतील.
  • नंतर तुमचा फोटो आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी घेतील.
  • तुमच्या आधार कार्डमधील फोटो २५ रूपये+जीएसटी अशी फी आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी आकारून अपडेट करेल.
  • तुम्हाला यूआरएन सोबत एक स्लिप देखील आधार नावनोंदणी केंद्राचे कर्मचारी देतील.
  • तुम्ही तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी हे यूआरएन वापरू शकता.
  • आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अद्ययावत आधार कार्ड यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!