खासदार रामदास तडस यांच्या मुलगा आणि पूजाचा अखेर वैदिक पद्धतीनं विवाह

0 60

वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांनी अखेर पूजाशी वैदिक पद्धतीनं विवाह केलाय. आपल्या घरीच अगदी साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडलाय. खासदार तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर मारहाण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अखेर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे

 खासदार रामदास तडस यांचे स्पष्टीकरण
“मागील वर्षी २० जून २०२० ला पंकज या माझ्या मुलाला संपत्तीतून बेदखल केलं होतं. त्यानंतर तो वर्ध्याला घर घेऊन राहायला लागला. त्याने पूजा नावाच्या मुलीसोबत ऑक्टोबरमध्ये लग्न केलं. त्यावेळेस आमच्या घरतल्या कुणालाच काहीही माहिती नव्हतं. लग्नाच्या वेळी मुलीचे जावई आणि बहीण हेच होते आणि त्यांनी ते लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघे जण फ्लॅटवर राहायला लागले. पंकज आणि पूजा एक दिवस माझ्याकडे आले. बाबा म्हणे आम्ही लग्न केलं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही लग्न केलं चांगलं झालं. तुम्ही दोघं सुखानं राहा. तुम्हाला घरी यायची इच्छा असेल, तर या. तुमच्यासाठी आमचं घर खुलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा यांनी आरोप केला की त्या सुरक्षित नाहीत. कुटुंबापासून धोका आहे. ते आमच्यासोबत राहातच नाही. आता राजकारणासाठी राजकारण करायचं. भाजपाच्या लोकांवर बेछुट आरोप करायचे. मी खासदार आहे. माझी पत्नी नगराध्यक्ष राहिली आहे. माझी मुलगी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमचं राजकारण कसं संपवायचं. या दृष्टीनं विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे.” असा आरोप खासदार रामदास तडस यांनी केला आहे.

पंकज तडस यांच्या म्हणण्यानुसार..
तर पंकज तडस यांनी आपण आधाही खूश होतो आताही आहोत. आपण यापूर्वीही पूजाला स्वीकारलेलं होतं आणि आताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती तो प्रश्न आता मिटला आहे. माझ्या वडिलांनी मला वर्षभरापासून बेदखल केलेलं आहे. माझ्या वडिलांचा आणि माझा कोणताही संबंध नाही. माझ्या वडिलांना आणि माझ्या परिवाराला गोवण्याचं काम सुरु आहे. 6 ऑक्टोबर 2021 ला माझं लग्न झालं होतं. त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे. आता त्यांच्या विनंतीनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचं पंकज तडस यांनी म्हटलंय.

पूजा तडस यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलं होतं?

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते”

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!