महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राकेश दादा पाटील प्रतिष्ठान तसेच अंबरनाथ नगरपरिषद ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्र. 56 मध्ये प्रथमच श्री गणेश भक्तांना कृत्रिम तलावाची सोय

0 170

बदलापूर, जाफर वणू – महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राकेश दादा पाटील प्रतिष्ठान तसेच अंबरनाथ नगरपरिषद ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पूर्वेकडील वार्ड क्र. 56 मध्ये दरवर्षी परिसरात मोठया प्रमाणात घरगुती व सार्वजनिक गणपती (गणेश) उत्सव साजरा केला जातो. पण दरवर्षी प्रमाणे यावर्षी परिसरातील गणेश भक्तांना गणपती विसर्जनासाठी कुठलीच सोय नाही. परंतु कोरोनाच्या महा भयंकर परिस्थिती मध्ये शासनाचे नियम लक्षात घेत आपल्याला गर्दीपासून लांब राहण्याकरिता घरगुती व सार्वजनिक गणपती (गणेश) विसर्जनाकरीता आपल्या प्रभागात कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे.

 

या विसर्जन कार्यक्रमाचे स्थळ विश्वनाथ चौक, जैनम रेसिडेन्सी समोर या ठिकाणी मनसे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष अजय मोतीराम पाटील ह्यांनी स्वतः पुढाकार घेत कृत्रिम तलाव तयार केले आहे. तेव्हा आपण विसर्जन ठिकाणी जास्त गर्दी करू नये. नियमितपणे मास्कचे वापर करावे आणि सर्वांनी शासनाचे नियम पालन करावे, अशी माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!