अंबरनाथमधील पाणीप्रश्नावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात चर्चा

0 78

अंबरनाथ,दि 09 ः
अंबरनाथ शहरात भेडसावत असलेल्या गंभीर पाणी समस्या बाबत ठाणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय येथे आज दि. 9 सप्टेंबर रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधीक्षक अभियंता अरुण निरभवने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे, बसनगर कार्यकारी अभियंता अंबरनाथ यांच्या समवेत शहरात चालू असलेला अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा, शहरातील होणारी पाणी गळती, नियोजनशून्य कारभार अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी शहरातील बकाळ पाणीपुरवठा व्यवस्था बाबतचा आढावा दिला.

यावर खासदार साहेबांनी आठ दिवसांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठाच्या बाबींबद्दल अनियमिततेबाबत सविस्तर माहिती मागवली आहे, तसेच येत्या काही दिवसांमध्ये ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी उपशहर प्रमुख संभाजी कळमकर, संदीप मांजरेकर, माजी नगरसेवक, निखिल वाळेकर पद्माकर दिघे, विभाग प्रमुख प्रकाश डावरे सचिन गुडेकर मिलिंद गान, अनिल घोणे, बाळा गायकर, शाखाप्रमुख अरविंद मालुसरे, श्रीनिवास वाल्मिकी, चेतन चव्हाण, महिला आघाडीच्या रेखा जेठवा, हसीना शेख, लीना सावंत ह्यांच्यासह आदी शिवसैनिक, महिला आघाडी, पदाधिकारी व कार्यकर्ते, उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!