आदर्श महाविद्यालय येथे नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट तसेच खरवई येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न

0 148

बदलापूर, जाफर वणू – बदलापूर पूर्वेकडील शिवसेनेच्या प्रयत्नांतून आदर्श महाविद्यालय येथे नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट केंद्राचे उद्घाघटन तसेच अमृत अभियानातून 18 कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित झालेल्या खरवई येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाघटन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीम अध्यक्ष प्रकाश पाटील, अंबरनाथ विधानसभा आमदार बालाजी किणीकर या सर्व दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 7.2 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी असून हे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर बदलापूर शहराच्या पूर्वेकडील दीड ते दोन लाख लोकांना याचा लाभ घेता येईल व पाणी टंचाईची समस्या बऱ्याच पैकी कमी होण्यास मदत होईल.

याप्रसंगी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार रवींद्र फाटक, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर ह्यांच्यासह बदलापूरतील आदी मान्यवर, शिवसैनिक, शिवसेनेचे नगरसेवक, महिला आघाडी, पदाधिकारी, युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

याप्रसंगी बोलत असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन दादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहर बदलत आहे तसेच शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकासकामे या शहरात होत आहे असे गौरवोद्गार काढले, या प्रकल्पामुळे बदलापूरकरांचा पाण्याची समस्या दूर होईल असा विश्वास व्यक्त केला.तसेच बदलापूर शहराच्या आणखी विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे वचन बदलापूरकरांना याप्रसंगी बोलताना दिले.

 

कोरोनाच्या महामारीशी लढण्याकरिता बदलापूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या नवीन ऑक्सिजन प्लॅन्टचे दि. 08 सप्टेंबर रोजी लोकार्पण सोहळा करण्यात आले आहे. या कोरोनाची महामारी असो अथवा पूर असो कुठल्याही संकटसमयी शिवसेना ही खंबीर पणे बदलापुरकरांच्या सोबत ठामपणे उभी राहिली आहे आणि आणि यापुढेही उभी राहील. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली बदलापूर शहराचा कायापालट होत आहे. अशीच विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून यापुढेही सुरू राहतील. असा विश्वास शहरप्रमुख वामन दादा म्हात्रे यांनी व्यक्त केला. तसेच सर्व मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!