आ. रमेश लटके यांनी एसआरए प्रकल्पात ढवळाढवळ करू नये- डॉ. राजन माकणीकर

0 26

मुंबई दि 11 (प्रतिनिधी) ः आमदार मतदार संघातील विकासकामा कडे लक्ष द्या, एसआरए मध्ये हस्तक्षेप करून स्वतः आणि हितचिंतकांचे परिशिष्ट-2 पात्र करून घेऊ नका अन्यथा प्रसंगी कायम घरीच बसावे लागेल. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनीआमदार रमेश लटके यांना  दिला आहे.

र डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की,झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आमदार रमेश लटके हे स्वार्थ साधन्याहेतु हस्तक्षेप करत असून मूळझोपडी वासीयांचा प्रश्न सोडून जेथून माया मिळेल अश्या लोकांना विकासक व अधिकाऱ्यांना आमदारकीचा बळ प्रयोग करून प्रकल्पाशी संबंध नसलेल्यांना सदनिका पात्र करून देण्यात अग्रेसर दिसत आहेत.

रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अश्या कटकारस्थानाला शह देऊन मूळ झोपडी धारकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी कटिबद्ध आहे. असे कोणी फसले असतील सदनिके पासून वंचित असतील अश्यांना आम्ही मूलभूत हक्का पासून संरक्षित करू असा मनोदय डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.आमदार लटके हे गरिबांच्या मूलभूत गरजा कडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी ज्यांनी सदनिकेचा ताबा मिळवून आपला संसार थाटत आहेत अश्यांना बाहेर काढून स्वतः ची पोळी भाजण्यात धन्यता मानत आहेत या त्यांच्या चुकीच्या व गरिबांना बेघर करण्याच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत असल्याचे डॉ. माकणीकर यांनी यावेळी जाहीर केले.

.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!