आ. गोपीचंद पडळकर यांचा शेण फासून काँग्रेस तर्फे जाहीर निषेध

0 29

चिमूर – भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रातील ओबीसी नेते बहुजन कल्याण मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या विरोधात महाज्योती संस्था व जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्या संदर्भात खालच्या स्तराचे वक्तव्य करून राज्यातील जनतेसह काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन दुखावली या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जि.प. सदस्य गजाननभाऊ बुटके व काँग्रेस नेते धनराज मुंगले यांच्या नेतृत्वाखाली चिमुर येथील जास्तीत जास्त वर्दळीचे ठिकाण असलेल्या नेहरू चौकात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोड्या-चप्पलेचे हार घालून “गोपीचंद पडळकर, मुर्दाबाद!” अश्या घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सुधीर पंदिलवार, चिमूर न.प. चे माजी नगरसेवक उमेश हिंगे, प्रा. राजू दांडेकर, जावाभाई, प्रमोद दांडेकर,राकेश साटोने, स्वप्नील लांडगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!