‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते संजय खरात राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत

0 45

 

दहिवडी – शैक्षणिक दीपस्तंभ संपादकीय मंडळाकडून दिला जाणारा मानाचा शैक्षणिक दिपस्तंभ राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार – 2021 माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन आभासी पद्धतीने सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय खरात यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास जि.प.अकोला येथील शिक्षणाधिकारी सौ. सुचिताताई पाटेकर , नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , राज्यातील डायटचे विविध अधिकारी तसेच आदरणीय शैक्षणिक दीपस्तंभ समूहाची संपूर्ण संपादकीय मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
खरात सरांनी आजपर्यंत केलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम तसेच कोरोना काळातही 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवणाऱ्या ‘घरोघरी शाळा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची स्वकल्पनेतून निर्मिती करुन महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सदर उपक्रमाविषयी केलेले मार्गदर्शन अशा विविध कार्याची दखल घेवून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक दीपस्तंभ संपादक मंडळाने सन 2021 पासून राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक दीपस्तंभ पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे.
खरात सरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाची प्रेरणा घेवून राज्यातील विविध शिक्षकांनी खरात सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवले आहे.
संजय खरात सरांना मिळालेल्या या राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील व राज्यातील विविध अधिकारी व पदाधिकारी तसेच ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम राबवणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षकांनी संजय खरात सरांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!