वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुक्याची आढावा बैठक संपन्न

0 323

 

आटपाडी – वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी गायगवाळे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच बूथनिहाय पदाधिकारी कार्यकर्ते तयार करणेच्या सूचना दिल्या, तसेच ओबीसी आरक्षण तिढा सुटेल कि नाही हे नक्की नसलेने ओबीसीना फक्त वंचित बहुजन आघाडी शिवाय कोणताही पक्ष संधी देऊच शकत नाही त्यामुळे तमाम ओबीसी कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीत सन्मानाने दाखल होण्याचे आवाहन गायगवाळे यांनी केले. त्याचप्रमाणे साहेबराव चंदनशिवे यांनी येत्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीला कोणत्याही क्षणी सामोरे जाण्याची आटपाडी तालुक्यातील तयारी असलेचे सांगितले.

यावेळी.l संतोष वाघमारे, स्वाती सवणे, राखीताई खरात, रोहन भिसे, सुरज भिसे,राहुल साबळे, दिपक चंदनशिवे, बाबासो काटे, शैलेंद्र आयवळे, सौरभ वाघमारे, अतुल वाघमारे, विनोद पवार, किरण खरात, सुनंदा मोरे, उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!