आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचेे आदित्य घुंडरे पा. यांची बिनविरोध निवड

आळंदी नगरपरिषदेत अपेक्षित भाजप-शिवसेना युती

0 494

आळंदी, प्रतिनिधी – आळंदी नगरपरिषद मध्ये भाजपचे पूर्ण बहुमत असून सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांची आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे, राज्यात एकमेकांचे विरोधक असलेले भाजप-शिवसेना आळंदी नगर परिषदेमध्ये मात्र कायम एकत्र राहिले आहे.

मावळत्या उपनगराध्यक्षा श्रीमती पारूबाई तापकीर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा १५ दिवसांत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली, भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासिन अधिकारी तथा आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ही निवड जाहीर केली.शासन निर्देशाने झूम ॲपद्वारे उपनगराध्यक्ष पदाची सभा घेण्यात आली, या सभेला १६ नगरसेवक उपस्थित होते. मावळत्या उपनगराध्यक्षा श्रीमती पारूबाई तापकीर आणि शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल कु-हाडे हे झुम ॲपद्वारे घेण्यात आलेल्या सभेला गैरहजर होते, उपनगराध्यक्ष निवडी नंतर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांचा सत्कार केला.

यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील,सचिन पाचुंदे,भाजप गटनेते पांडुरंग घुले,विरोधी पक्षनेते तुषार घुंडरे,नगरसेवक प्रशांत कु-हाडे,सागर बोरुंदिया,सचिन गिलबिले,प्रकाश कु-हाडे,सागर भोसले,सचिन गिलबिले, नगरसेविका प्राजक्ता घुंडरे,मीराताई पाचुंदे,शैला तापकीर,प्रमिला रहाणे,सुनिता रंधवे,रुक्मिणीताई कांबळे,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,दिनेश घुले,संदिप रासकर,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर,भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे,नितीन घुंडरे,मयूर घुंडरे,प्रीतम किरवे, प्रमोद कु-हाडे,अरुण घुंडरे,अविरत फाउंडेशनचे अध्यक्ष निसारभाई सय्यद उपस्थित होते.

माझ्यावर विश्वास दाखवत जी जबाबदारी सोपवली ती निश्चितच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करणार आहे. तसेच आळंदी शहराच्या विकासाच्या दृष्टीने माझे जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!