अतिवृष्टीनंतर पीक जगविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत

महागडी औषधांची केली जातेय फवारणी ; उत्पादन खर्च निघणे कठीण

0 56

झरी, अनिल जोशी – झरी परिसरात काही दिवसांपुर्वी अतिवृष्टी झाली. यामुळे नदीनाले एक झाल्याने पुर आला व याचे पाणी शेतातील पिकांत घुसल्याने अधिक शेतजमिनीतील पिके बाधित झाली. याचे पंचनामे सुरू असले तरी पाण्यात राहिलेली पीके पुन्हा जगविण्यासाठी शेतकरी महागडी औषधांची फवारणी करत आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने पीक काढणीनंतर किती पैसे मिळतात याकडे नजरा लागल्या आहेत.

 

झरी परिसरात मंगळवारी (दि.7) सकाळपासून दोन दिवस जोरदार पाऊस झाला. यातच बुधवारी अतिवृष्टी झाल्याने नदीनाले एक होवून , दुधनासह आदी मोठया नद्यांना महापुर आले होते. या पुराचे पाणी अनेकांच्या घरांसह शेतात घुसले. शेतात खरिपातील चांगली बहरलेली पिके या पुराच्या पाण्यामुळे पिवळी पडल्याने शेतकरी चागलाच हवालदिल झाला होता. यातच शेतकर्‍यांनी या नुकसानीबाबत कृषी विभागाकडे धाव घेत विमा कंपनीकडून भरपाईची मागणी केलेली आहे. पण ही भरपाई कधी मिळेल याची वाट न पाहता शेतकर्‍यांनी उसनवारी करत पाण्यात राहिलेली पीके जगविण्यासाठी कसरत सुरू केली आहे. यातच महागडी असलेली टॉनिकची औषधी विकत घेत त्यांची फवारणी करून पिके हिरवीगार करण्याचा केविलवाणा प्रयोग शेतकरी सध्या करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. यात सोयाबीन व कापुस या पिकांचे सद्यस्थितीला मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पिकांना जीवदानासाठी शेतकरी कसरत करीत असले तरी झालेला उत्पादन खर्च निघतो की नाही याचीही चिंता शेतकर्‍यांना मोठी भेडसावत आहे. अनेक शेतकर्‍यांनी रिलायन्स जनरल इन्शुरंन्स कंपनीकडे पिकांचा विमा उतरविला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांना भरीत मदतीतून द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

shabdraj reporter add

शेंगांचा होतोय नाश
सध्या सोयाबीन हे पीक चांगले बहरलेले आहे. या पिकाला शेंगाही चांगल्या लगडलेल्या असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पाण्यात हे पीक गेल्याने त्या शेंगा पाण्यामुळे नाशवंत होत असल्याचे वास्तव अनेक शेतात पहावयास मिळत आहे. पिक महागडी औषधांची फवारणी करून हिरवेगार होत असले तरी शेंगा नाशवंत होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!