सांगरूणमध्ये घरगुती पाच दिवसाच्या गौरी गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

0 78

खडकवासला, प्रतिनिधी – गणेश चतुर्थी पासून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमना पासून सुरू असणारी धावपळ व आनंदाचे वातावरण गोडधोड पदार्थ मोदक हे एक चैतन्य निर्माण करणारे वातावरण त्याचसोबत विविध प्रकारची आरास, विधुत रोषणाई अशी अनेक प्रकारची सेवा प्रत्येक भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी करत असतो. सतत पाच दिवस सेवा करता करता कळतच नाही निरोप द्यायची वेळ कधी आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे प्रत्येक घरातला आनंद शिगेला पोहोचलेला असतो. आज त्याच घरगुती गौरी गणपतीला सांगरूण गावच्या नदी काठी भक्तीमय वातावरणात निरोप गणेशभक्तांनी दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी अवघा नदीकाठ दुमदुमून सोडला होता. परंतु आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक गणेशभक्ताचा कंठ दाटून आलेला पाहायला मिळाला. निरोप देताना देवाकडे मागणी देखील केली ती म्हणजे कोरोनासारखी जागतिक महामारी संपूष्टात येऊ दे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!