बोपोडी भागात विविध विकासकामांची पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून पाहणी

0 41

खडकवासला, प्रतिनिधी – प्रभाग क्र. ८ बोपोडी. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम चिखलवाडी. येथे पुणे महानगरपालिका आयुक्त माननीय विक्रम कुमार यांनी आज भेट दिली. सदर स्टेडियम मध्ये उपमहापौर माननीय सुनीताताई वाडेकर यांच्या निधीतून विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत तरी संबंधित स्टेडियम मध्ये काही विकासकामे निधीअभावी अपुरी राहिल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत उपमहापौरांनी योग्य ती माहिती दिली व आयुक्तांनी संबंधित सर्व प्रशासनाला २ महीन्यात उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच पुण्यातील सर्वात मोठे भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार पुणे विद्यापीठ येथे साकारण्यात येत आहे तेथे ही आयुक्तांनी भेट देऊन लवकरात लवकर तो प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष आयुष्यमान परशुराम वाडेकर व संबंधित खाते अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!