Breaking News : पेट्रोलचे दर येणार अर्ध्यावर ?

0 326

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकं त्रस्त झाले आहेत. परंतु लवकरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो.

shabdraj reporter add

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील समिती १७ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोल-डीझेल जीएसटीअंतर्गत आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. सध्याची कर रचना आणि जीएसटी कर रचना लक्षात घेतल्यास सर्वाधिक जीएसटी लावून इंधन जीसएसटीअंतर्गत आणण्यात आले तरी पेट्रोलचे दर जवळजवळ अर्ध्याने कमी होतील.

pune lok1

जीएसटी यंत्रणेनुसार कोणताही बदल करायचा असल्यास नियोजित समितीमधील तीन चतुर्थांश सदस्यांकडून त्यासाठी होकार येणं गरजेचं असतं. यामध्ये सर्व राज्यांचे आणि क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात. काहींनी जीएसटी यंत्रणेमध्ये इंधनाचा समावेश करण्याला नकार दिलाय. महाराष्ट्राने मात्र २०२१-२२ च्या अर्थसंकल्पादरम्यान  पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी ते वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्याची गरज असून केंद्र सरकारने तसा प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र पाठिंबा देईल असं जाहीर केलं आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना १० मार्च रोजी ही घोषणा केलेली. इंधन सुद्धा जीएसटीअंतर्गत आल्यास राज्यांच्या कमाईचा एक मार्ग केंद्र सरकारच्या हाती जाईल अशी भीती काही राज्यांनी व्यक्त केलीय.

सध्या भारतामध्ये चार प्रकारचा जीएसटी आकारला जातो. यामध्ये सर्वात कमी पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार प्रकार आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास केंद्र आणि राज्य सरकार करांच्या नावाखाली इंधनावर १०० टक्के कर वसूल करत आहे.

त्यामुळे सर्वाधिक जीएसटी लावला तरी पेट्रोलची किंमत ६० रुपये प्रति लीटरच्या खालीच राहील असा अंदाज आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारला जातो. दोन्ही करांचा बोजा एवढा जास्त आहे ३५ रुपयांचे पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९५ ते ११५ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचलं आहे.

सध्या तरी इंधनशी संबंधित गोष्टी जीएसटीअंतर्गत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तर अर्थमंत्रालय किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सीएनबीसी टीव्ही १८ ने यासंदर्भातील विचार सरकार करत असल्याचे वृत्त दिलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!