माजी विद्यार्थ्यांकडून चांदोरी विद्यालयास एक नवीन हॉल व १ लाख रुपये प्रदान

0 51

 

निफाड, रामभाऊ आवारे – रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल चांदोरी विद्यालयात शैक्षणिक वर्ष 1986-87 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा नुकताच विद्यालयात संपन्न झाला.यावेळी 1986 च्या दहावीच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

भुतकाळात घडलेल्या सर्व आठवणींना उजाळा देत,एकमेकांची गळाभेट घेत हर्षोल्हासात सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी एकमेकांना भेटत होते.यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोज एस टी,सर होते.विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.

यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांकडून तत्कालीन शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर व विद्यालयाचे माजी शिक्षक वडजे सर ,वडजे मॅडम तसेच दरेकर सर,दरेकर मॅडम,धोंडगे बी जी सर,धोंडगे एस डी सर, सावळा सर,कापडणीस एम टी सर,क्षीरसागर सर, गायकवाड व्ही टी सर,गोसावी सर, निर्मळ सर,साळी सर,परदेशी सर,शेख सर,हे सर्व माजी शिक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी तत्कालीन माजी विद्यार्थ्यांपैकी सुप्रसिद्ध डाॕ.संजय म्हसु आहेर व वनविभागातील कार्यक्षम अधिकारी देविदास(आण्णा) त्र्यंबक चौधरी यांनी प्रत्येकी ५१००० रुपयांची देणगी विद्यालयास जाहीर केली.तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयाच्या प्रस्तावीत नुतन इमारतीच्या बांधकामाप्रसंगी एका वर्गखोलीचा खर्च करण्याचे जाहीर करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार,मनोगते आणि औपचारिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी प्रीतीभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विशेष उल्लेख करावा असे लता नाठे, संजय हांडगे, डॉक्टर संजय आहेर, बाळासाहेब गडाख ,बाळासाहेब वनारसे , शबाना , संध्या, सविता, दीपक पाटील, बाळासाहेब आहेर,तसेच या बॅचचे तत्कालीन विद्यार्थी व सध्या विद्यालयाचे सेवक म्हणून कार्यरत असणारे लक्ष्मण कोरडे, व अशोक कोकाटे यां सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

यावेळी स्थानिक स्कुल कमिटीचे देवराम आप्पा निकम, जगन्नाथशेठ नाठे,माणिकशेठ गायखे,संजय आण्णा गायखे,सरस्वती ताई कोटमे ,दाते मॅडम,विद्यालयाचे उपमुख्याध्यापक त्र्यंबके सर ,एम एफ. टर्ले सर,विष्णू कोरडे सर,वसंतराव टर्ले,राजाराम टर्ले सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!