लोकसेवक पतसंस्थेचा १ कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण

0 59

नेवासा, अमोल मांडण –  आजच्या धावपळीच्या युगात बँकिंग क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.तरीसुद्धा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील अल्पावधीत सहकार क्षेत्रात नावारूपास आलेल्या लोकसेवक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने मात्र आठ महिन्याच्या कालावधीतच आपला १ कोटींच्या ठेवीचा टप्पा पुर्ण केला आहे. ठेवीदार, कर्जदार, सभासदांचे सहकार्य व विश्वासावर पतसंस्थेची वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी भक्कम पाठबळ देणारी व एक आधारवड बनलेली हि पतसंस्था नवउद्योजकांसाठी आशेचा किरण बनलेली आहे. भेंडे व पंचक्रोशीतल्या अर्थकारणाला गती आणि बळकटी देण्याचे काम लोकसेवक पतसंस्था करीत आहे. नेवासा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात मात्र आठ महिन्याच्या कालावधीतच १ कोटींच्या ठेवी पूर्ण केलेली लोकसेवक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था खातेदारांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याची माहिती पतसंस्थेच्या चेअरमन तथा सौंदाळा गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका शरदराव अरगडे यांनी दिली आहे.

पतसंस्थेची ३१ ऑगस्ट २०२१ अखेर सभासद संख्या ६७३ इतकी असुन सभासद भागभांडवल ७ लाख ९४ हजार असुन ९ लाख ३० हजार एवढा स्वनिधी आहे. पतसंस्थेकडे १ कोटी २ लाखाहून अधिकच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने ७६ लाख ८९ हजार चे कर्ज वाटप केले आहे. तर २४ लाख रुपयाची गुंतवणूक केली आहे.

लोकसेवक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चेअरमन,सर्व संचालक मंडळ व सचिव यांनी सर्वप्रथम सभासद, ठेवीदार, कर्जदार,खातेदार व हितचिंतक यांचे आभार मानले.

लोकसेवक पतसंस्थेने कमी कालावधीत जनतेचा विश्वास संपादन करून प्रगतीकडे वाटचाल केल्याबद्दल नामदार श्री.शंकरराव गडाख पाटील, ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे चेअरमन माजी आ. नरेंद्र घुले पाटील, माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील आणि श्री.गोकुळ नांगरे,सहायक निबंधक,सहकारी संस्था नेवासा यांनी अभिनंदन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!