संततधार जोरदार पावसामुळे भदर येथे घर कोसळून नुकसान, सुदैवाने जिवितहानी टळली

0 94

सुरगाणा, दौलत जाधव – तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार होत असलेल्या पावसामुळे भदर येथे ता.१४/९/२०२१ रोजी रात्री दिड वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना तुळशीराम मोहन चव्हाण रा. भदर या शेतकऱ्यांच्या घराचा मागील अर्धा भाग अचानक कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या मागील भागात पाच ते सात दुधाळ जनावरे लावणीला बांधली होती.

शेतक-यांचे कुटुंब घराच्या पुढील भागात झोपलेले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. नुकसानी मध्ये घराचा पाया ढासळला असून घरावरील तीस ते पस्तीस सिमेंटचे पत्रे तुटली आहेत. तर घरावरील लाकडी वासे मोडले आहेत.

तसेच लोखंडी दांड्या मोडकळीस आलेल्या आहे. तलाठी जे.एस. वाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ६१हजार २०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती नायब तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी दिली आहे. सदर शेतक-यांस तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी मागणी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!