लोहा ठाण्याअंतर्गत 73 गणेश मंडळाची स्थापना तर  26 गावात एक गाव एक गणपती 

जुगार खेळणे  खपवून घेणार नाही-पोलीस निरीक्षक तांबे 

0 107

लोहा, माधव पांचाळ – श्री गणेशाची मूर्ती स्थापना व विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो  या अनुषंगाने लोहा शहरा सह ठाण्याच्या हद्दीत 62 परवाना धारक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे तर विनापरवाना 11 गणेश मंडळांनी श्री ची स्थापना केली आहे यात 26 गावात एक गाव एक गणपती स्थापन करून एकात्मतेचा संदेश दिला आहे  उत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे गर्दी होऊ नये  याची काळजी घ्यावी  गणेश मंडळाच्या ठिकाणी कोणी ही जुगार पत्ते गैरवर्तन करणार नाही याची काळजी  मंडळाच्या अध्यक्षांनी  घ्यावी अन्यथा जुगार खेणाऱ्याची गय केली जाणार नाही अशी सूचना लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना केली आहे

श्री ची स्थापना व विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असे असले तरी सद्या कोरोनाचा काळ आहे कोरोना कमी झालेला नाही यासाठी शासनाने गणपती काळात जे नियम लागू केले आहेत त्या सर्व नियमांचे पालन करावे दर्शनासाठी गर्दी करू नये सामाजिक उपक्रम राबविले जात असताना आरोग्याची काळजी घ्यावी विसर्जन मिरवणुकीत गर्दी टाळावी गुलाल उधळू नये  विसर्जन करण्यासाठी तलावाजवळ गर्दी करू नये  स्थापने पासून विसर्जन काळापर्यत गणेश मंडळाच्या ठिकाणी पत्ते जुगार दारू पिणे आदी गैरवर्तन करू नये तसे आढळून आल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची काळजी घ्यावी अशा सूचना पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिल्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!