पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात खडकवासला भागावर अन्याय-नितीन वाघांची हरकत दाखल.

0 101

खडकवासला,दि 15 (प्रतिनिधी)ः
पुणे महानगर विकास प्राधिकरणाने नुकताच विकास आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केला.हा आराखडा तयार करताना खडकवासला ग्रामीण भागाच्या विकासासाठी दूरदृष्टीने विचार करण्यात आला नाही. नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा व बाबींचा विचार ह्यात करण्यात आला नाही. या आराखड्यात पाणी, रस्ते, स्मशानभूमी, क्रिडागंण या गोष्टींचा विकासामध्ये विचार करण्यात आलेला दिसत नाही. या भागात वैद्यकीय सुविधा व्यवस्थित नाही याचा प्रत्यय कोरोना काळात प्रामुख्याने जाणवला आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेबाबत यात विचार झालेला दिसत नाही, असे असेल तर ग्रामीण भागातील तरूण तरूणी उच्चशिक्षणापासून वंचित राहून वर्तमान काळातील विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब रहाणार. अनेक जुने रस्ते सोडून शेतकर्यांच्या शेतावरून नवीन रस्त्याचे नियोजन करून भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. या भागात अनेक पर्यटन स्थळे असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते रूंदीकरणाबरोबर सुशोभीकरणाचे देखील नियोजन यात दिसत नाही.असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यामुळे ह्या विकासाबाबत दूरदृष्टी दिसत नाही उलट अनेक त्रुटी यात दिसत आहे. यामुळेच शिवसेनेचे खडकवासला क्षेत्रिय प्रमुख व मा.पंचायत समिती सदस्य नितीन वाघ यांनी याबाबतीत असणाऱ्या त्रुटीबाबत हरकती नोंदवल्या आहेत. व खडकवासला भागातील विकास आराखड्याबाबत पुन्हा विचार करावा व यात या भागातील शेतकर्याचे नुकसान होऊ नये याचा विचार करण्याची मागणी केली आहे. याबाबत नितीन वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांना हरकती दिल्या आहेत .

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!