51 फुटी रावणाच्या प्रतिमेचे पूर्णेत होणार दहन

राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीचा पारंपारीक उपक्रम

0 127

 

पूर्णा, सुशिलकुमार दळवी – श्री राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जुना मोंढा मैदान येथे 51 फुटी रावण दहन व भव्य अतिषबाजीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

 

dr. kendrekar

गेल्या पंचवीस वर्षापासून पूर्णा शहरात मा.खा.संजय (बंडू )जाधव यांच्या प्रेरणेतून राजे संभाजी नवरात्र महोत्सवाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात येते. दोन वर्षाच्या कोविड-19 च्या प्रादूर्भावानंतर यंदा हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे.

 

संस्थापक अध्यक्ष सुधाकर खराटे यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र महोत्सवाची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून कार्यकारी अध्यक्ष वैभव कुऱ्हे,अध्यक्ष सोम डहाळे ,उपाध्यक्ष अक्षय कानबाले, सार्थक टाक, सचिव संदीप हानवते, सहसचिव बालाजी वाघ,कोषाध्यक्ष सोमनाथ कदम, सहकोषाध्यक्ष सुशिल ठाकूर यांची निवड करण्यात आली. यावेळी समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षी समितीच्या वतीने महिला व बालकांसाठी विविध कार्यक्रमाचे व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात प्रामुख्याने संगीत खुर्ची,पिलो पासिंग, मटकी फोड,आनंद नगरी,होम मिनिस्टर,उखाणे स्पर्धा,रावण दहन व अतिषबाजी आदी चा समावेश आहे.

 

विजयादशमीच्या निमित्ताने दि.5 ऑक्टोबर बुधवार रोजी जूना मोंढा मैदान येथे मा.खा.संजय (बंडू )जाधव यांच्या हस्ते सांय 8:00 वा. भव्य अतिषबाजीचे व रावण दहनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव,सुधाकर खराटे,,अतुल तात्या सरोदे,सोपानकाका बोबडे,दशरथ भोसले, काशिनाथ काळबांडे,तहसिलदार पल्लवी टेमकर , उपअधिक्षक गावंडे ,पो.निरीक्षक मार्कंड ,रामप्रसाद रणेर,संतोष एकलारे,डॉ.झवंर साहेब,डॉ.सोनी,डॉ.विनय वाघमारे,डॉ.गुलाबराव इंगोले, शहर प्रमुख मुंजा कदम,साहेब कदम,श्याम कदम,राजू भालेराव,श्याम अजमेरा,बंडू बनसोडे, रवि जैस्वाल,राजू एकलारे,हरिभाऊ पाटील जगदीश जोगदंड,हिराजी भोसले,डि.एल.उमाटे सर,शिवदर्शन हिंगणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पूर्णा व पूर्णा परिसरातील तमाम नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान नवरात्र समितीचे मुख्य संयोजक नितीन( बंटी) कदम यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अतुल शहाणे,शिवप्रसाद ठाकुर सर,ईश्वर ठाकुर,अमोल ठाकुर,किशोर कदम, विठ्ठल डहाळे,ऋतिक कमळू,शुभम दडपे,अशोक कदम आदी परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!