नांदगाव मध्ये वीज पडून माडाचे नुकसान
मजगांव, बाबूराव गोळे – नुकत्याच पडलेल्या वादळी पावसाने मुरुड तालुक्यातील नांदगांव माळी वाड्यातील पांडुरंग सखाराम मळेकर यांच्या वाडीतील नारळाचे एक बाजते झाड,सुपारी व कोकम झाडाचे तर शेजारील चारुशीला वराडकर यांच्या वाडीतील बाजत्या नारळ झाडाचे वीज पडून नुकसान झाले.
या बाबत मुरुड तहसील कार्यालयाचे नांदगाव मंडळ अधिकारी किरण जुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आर.एन. पाटील यांनी रितसर पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.