पुरंदर तालुक्यातील विराज जगताप हत्या प्रकरणाचा बहुजन हक्क परिषदकडून निषेध

0 94

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील विराज जगताप हत्या प्रकरणाचा बहुजन हक्क परिषदकडून निषेध करण्यात आला. सासवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना निवेदन देण्यात आले.

पुण्यातील पिंपळे सौदागर येथील वीस वर्षीय तरुण विराज जगताप याची हत्या झाली असून पुरंदरमध्ये बहुजन हक्क परिषदेचे वतीने विराजला आदरांजली वाहत या हत्येचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. अशा प्रकारची जातीयवादी मनोवृत्ती तुन अशा प्रकारची माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडू नयेत हे आजच्या तरुणांपुढे मोठे आव्हान आहे.

तरुणांनी जातीपलीकडे माणुसकी जपली पाहिजे. जातीव्यवस्था नष्ट करण्याची ताकत तरुण पिढीत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रात अशाप्रकारे मनुवादी मनोवृत्ती असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा कलंक आहे.हा गंभीर गुन्हा फास्टट्रॅक कोर्ट मध्ये चालवावा आणि सहभागी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्र म्हणत असताना महाराष्ट्रात अशा जातीच्या विळख्यात अडकलेल्या वृत्तीने अनेक तरुणांचे जीव घेतले आहे. या महाराष्ट्रात जातीयतेसाठी अनेक राष्टपुरुष लढले आहेत.आजही अशा घडणे लज्जास्पद बाब आहे.तसेच काही मनुवादी प्रवुत्ती फेसबुक, व्हाट्सएपच् व टिकटॉक वर दोन जाती मध्ये तेढ निर्माण होतील अशा पोस्ट टाकत आहेत त्यावर पोलिसांनी कारवाई करावी.

कृपया अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नयेत असे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार यांनी सांगितले. आजच्या प्रत्येक तरुणाने मनावर घेतले तर जातीयतेला पूर्णविराम देण्यास वेळ लागणार नाही. हे अस का घडते ? हा प्रश्न मांडून थांबणे पर्याय नाही तर त्यावर कृती करणं गरजेचं आहे.

ही वेळ आपल्या कोणावर येईल तेव्हा आपण निषेध नोंदवू, ही वाट पाहिली तर उद्या आपण विराज जगताप होऊ हे आव्हान तरुणांनी स्वीकारावे असे मत यावेळी बहुजन हक्क परिषदेचे उपाध्यक्ष शशीभाऊ गायकवाड यांनी मांडले यावेळी, कैलास धिवार ,परवीन पानसरे ,रामदास कदम ,प्रकाश धिवार,विकास जगताप ,संदेश सोनवणे,योगेश सोनवणे,अनिकेत बोडरे ,कृष्णा फुलावरे आदी उपस्थित होते.

धानोरा काळे परिसरात धुवाधार पाऊस: नदी नाले तुडूंब

 

error: Content is protected !!