माणगांव तालुक्यात भाताच्या रोपांची समाधानकारक वाढ – तालुका कृषी अधिकारी पी बी नवले

1 138

बोरघर / माणगांव , विश्वास गायकवाड – रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील भाताच्या रोपांची उत्कृष्ट जोरदार आणि समाधानकारक वाढ होताना दिसून येते आहे.

संपूर्ण देशासह राज्यात सर्वत्र कोरोना विषाणू प्रतिबंधक लाॅकडाऊन संचारबंदी असताना सदर कालावधीत शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून माणगांव तालुक्यातील शेतकर्यांनी कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध बियाणे आणि खते आणि शेताच्या बांधावर कृषी अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे वेळेत उपलब्ध झालेल्या कृषी बी बियाणे यांचा वापर करून शेतकर्यांनी आपापल्या शेतात केलेल्या भाताच्या पेरणी नंतर जून महिन्याच्या एक तारखेपासून तालुक्यात सर्वत्र समाधानकारक झालेल्या पावसामुळे आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री पांडुरंग शेळके आणि माणगांव तालुका कृषी अधिकारी पी बी नवले यांच्या योग्य मार्गदर्शन व शेतकर्यां उत्तम व्यवस्थापनामुळे या वर्षी माणगांव तालुक्यात सर्वत्र भाताच्या रोपांची उत्कृष्ट आणि समाधानकारक वाढ झालेली दिसून येते आहे.

माणगांव तालुका कृषी अधिकारी श्री पी बी नवले साहेब यांनी माणगांव तालुक्यातील खरवली गावातील भातशेती ला भेट देऊन भात रोपवाटिकांची पाहाणी करून खरवली गावातील शेतकर्यांना भाताची लागवड आणि खतांचा वापर या बद्दल माहिती देऊन शेतकर्यांना शेतीपूरक मार्गदर्शन केले.

माणगांव तालुक्याच्या विविध विभागातील शेतकर्यांनी सुमारे १२५० हेक्टर भातशेती क्षेत्रावर भात पिकाच्या रोपवाटिका तयार केल्या असून या रोपवाटिकांच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील सुमारे १२५०० क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाणार आहे.

तसेच माणगांव तालुक्यात नाचणी पिकांच्या २२० रोपवाटिका तयार करण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून २२०० हेक्टर क्षेत्रात नाचणीच्या तथा नागली च्या पिकाची लागवड केली जाणार आहे.

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या मार्फत निवेदन

 

error: Content is protected !!