दारूची झडती करताना मिळाली बारा बोर सिंगल रायफल

0 134

चिमूर – शेगाव पोलीसांना मिळालेल्या गुप्त सुचनेनुसार वाहनगाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकुन एकोवीस हजाराची अवैध देशी दारू मुद्दे मालासहीत जप्त करीत असताना बाजुच्या घराची झडती घेतली त्या घरात बारा बोर सिंगल रायफल मिळाली हि कारवाई रवीवारला पहाटे पाच वाजता करन्यात आली. यातील अवैध दारू विक्रेते अजितसिंग मानसिंग अंद्रेले व अवैध बारा बोर रायफल जगदिशसिंग भोंड यांना अटक केली.

पहील्या कारवाईत अवैध दारू विक्रेते अजितसिंग अंद्रेले यांच्या घराची झडती घेताना देशी दारूचे १८० एमएलचे ९५ नग १९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून २०४ / २० क ६५ (इ) दारूबंदी कायदा सहकलम १८८ भादवी अंतर्गत कारवाई केली.

तर दुसऱ्या कारवाहीत जगदीशसिंग भोंड याच्या घराची झडती घेत असताना बारा बोर रायफल मिळाली. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत २०५/२० क ३ /२५ सहकलम अंतर्गत कारवाई केली. दोन्ही आरोपीना वरोरा न्यायालयात हजर करन्यात आले होते.

हि कारवाई पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी,उपअधिक्षक प्रशांत खैरे, एसीपी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे पीएसआय प्रविण जाधव, एएसआय अशोक क्षीरसागर, आमने, पोसी विठ्ठल,निकीता रासावर आदी कर्मचाऱ्यांनी केली. अवैध दारू झडती दरम्यान वहानगाव मध्ये रायफल मिळाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…

 

error: Content is protected !!