पारंपरिक वाद्य व इतर कलावंतांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी-साहेबराव चंदनशिवे

0 162

आटपाडी, प्रतिनिधी – आजच्या काळात हिंदू संस्कृतीच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यात तसेच मनुष्याच्या जन्मापासून ते मरणापर्यंत अगदी गावगाड्यातील पारंपरिक सुरसनई ताफा वाजल्याशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही. गावगाड्यातील या पारंपरिक वाद्यवृदांमुळे मांगल्याचे शुभ वातावरण निर्माण होते. त्यामुळे त्याचे महत्व आजही तेवढेच टिकून आहे.

कोरोना च्या काळात समाजातील सर्वच घटकांना सरकारने मदत करून लॉकडाऊनच्या काळात अर्थसहाय्य केले आहे. परंतु प्रत्येक कार्यक्रमात सर्वात पुढे होऊन मांगल्याची सनई व इतर वाद्य वाजविणारे हे कलावंत सद्यपरिस्थितीत मदत मिळण्यापासून सर्वात मागे राहिल्याने उपेक्षितांचं जिणं जगत आहेत.गावगड्यातील भजनी मंडळ, कीर्तनकार, कथाकार, वाघ्या मुरळी,भारूडकार, वासुदेव, पिंगळा जोशी, हेळवी हे सर्वच कलाकार आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत.

वरील सर्व कलावंत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ययुगीन कालखंडापासून पारंपरिक प्रथा व कला जपत असून हे सर्व बहुजन कलाकार हिंदू संस्कृतीतील महत्वाचे घटक आहेत.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर हे सर्व कलाकार हाताला कामधंदा नसल्याने व कार्यक्रमाची मागणी नसल्याने साध्या दोन वेळच्या अन्नाला महाग झाले आहेत.

म्हणून 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाचा बराचसा निधी ग्रामपंचायतीकडे शिल्लक आहे. या निधीतून पारंपरिक प्रथा , परंपरा जोपासून हिंदू संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या गावगड्यातील, बारा बलुतेदार बहुजन समाजातील कलावंतांना भरघोस आर्थिक सहाय्य मिळाल्यास त्यांचे दुःख थोडं फार दूर होईल.

यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत गुंडेवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित,शैलेंद्र ऐवळे,आबासो काटे,योगेश सावंत होते. या कलावंतांना 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातील निधीतून आर्थिक मदत देण्यास ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

read more – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
read more – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट



error: Content is protected !!