Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1164

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1165

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1166

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1177

कृषि क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या महिलांचा अग्रिमा एक्झिमतर्फे विविध पुरस्कारांनी गौरव.

0 173

पुणे, प्रतिनिधी – कृषि उत्पादने निर्यातीच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या पुण्यातील अग्रिमा एक्झिम या निर्यातदार कंपनीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कृषि क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहा कर्तबगार महिलांना बुधवारी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
बालगंधर्व रंगमंदिर चौकालगत एलिझियम बॅन्क्वेट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या राजश्री तापकीर यांच्या हस्ते आणि अग्रिमा एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जाधव यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले.

स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतीची मशागत करणाऱ्या पुजा भंडारी यांना कृषि चळवळ समृद्धी पुरस्कार देण्यात आला, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या नवनव्या तंत्राचा वापर शेतीत केल्याबद्दल सुवर्णा खिलेगाव यांना शेतीतील इनोव्हेशनसाठीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

कृषि क्षेत्रातील उत्तम व्यवस्थापक पदासाठीचा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार वनिता राठवाडकर यांना देण्यात आला. तर शेतीमालाच्या पॅकेंजिंगचे काम करणाऱ्या सोनाबाई शिंदे यांना श्रम पुरस्काराने गौरविले गेले. शेत कामगार मायाबाई कमलाकर यांना ग्रीन लेडी पुरस्काराने तर शेती क्षेत्रातील समाजकार्याबद्दल कल्पना वर्पे यांना सामाजिक पुरस्कार दिला गेला.

या सहा पुरस्काराबरोबरच कृषि क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल20 महिला कामगारांचा श्रीमती तापकीर यांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.

कृषि क्षेत्राला चालना देण्यासाठी कंपनीतर्फे आजपासून अल्पमुदत कर्ज योजना सुरु करण्यात आली असून या कर्जवाटपातही महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेती उत्पादने निर्यातीसाठी कंपनीतर्फे शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात असून शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठीही अग्रीमा एक्झिम प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले. कृषि मालाच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरि सहाय्य करण्याचा अग्रिमा एक्झिमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क़षी माल आयात- निर्यातीच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यात त्यांनी मोलाचे योगदान द्यावे, असा कंपनीचा मानस असून त्यासाठी भविष्यातही कंपनीतर्फे असे विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहितीही जाधव यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!