लिमला मंडळात पिकांचे अतोनात नुकसान; सरसकट पीक विमा मंजूर करण्याची मागणी

0 223

परभणी,प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे ( लीमला मंडळ )परिसरात गेल्या दोन दिवसंपासून सलग जोरदार पावसाने हजेरी लावली असून दी .1 सप्टेंबर रोजी वातावरणात बदल होत रात्रभर मुसळधार पाऊस झाला 2 सप्टेंबर रोजी आतिवृष्टी होत लीमला मंडळात 77 मिमी पावसाची नोंद झाली यामुळे गोदावरी नदीसह छोटे मोठे ओढे दुथडी भरुन वाहत आहेत .दिग्रस बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात परिसरातील नद्या ओढ्यांचे तसेच गोदावरी नदी वरील बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून ताडकळस पालम राज्य रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात विष्णुपुरी प्रकल्पात होत आहे. सद्यस्थितीत सोयाबीन,कापूस,तुर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन ,कापूस पीक हातचे जाण्याची शक्यता आहे जोरदार पावसाने पिकात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने सोयाबीन पिकाच्या शेंगा सडत आहेत त्या सोबतच शेतकऱ्याचे नगदी पीक असलेले कापूस पीक चांगल्या प्रकारे फुले व नोंदणी बहरला होता परंतु सततच्या जोरदार पावसाने कापसाचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाच्या जोरदार फटक्यामुळे हता तोंडाशी आलेले पीक शेतकऱ्याच्या हातून गेल्यामुळे परिसरातील मुंबर, गोळेगाव,धानोरा काळे, बानेगाव,कळगाव येथील शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही आट न लावता सरसकट पीक विमा मंजूर करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

धानोरा काळे शिवारात गेले दोन दिवसापासून जोरदार होत असलेल्या आतिवृष्टीने सोयाबीन ,कापूस ,तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे तरी तात्काळ नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही आट न लावता सरसकट पीक विमा मंजूर करावा.
बालासाहेब केरबाजी काळे शेतकरी,धानोरा काळे,ता.पूर्णा

error: Content is protected !!