महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

0 155

मुंबई, 1 जून : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आ महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही खळबळजनक घटना मानली जातेय. कारण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काही कामानिमित्ताने परदेशात गेले आहेत. असं असताना अचानक शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. या दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली, पण ही भेट अराजकीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते.

error: Content is protected !!