काँग्रेसला मोठे खिंडार, ‘हे’ आठ आमदार भाजपमध्ये

0 322

पणजी : Goa Congress Eight Mla Join Bjp : मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे. गोव्यात काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. मायकल लोबोंसह 8 आमदारांचा गटाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारे सर्व आठ आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दाखल झालेत. यामुळे आता गोवा काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकीकडे भारत जोडो यात्रा सुरु असताना गोव्यात मात्र काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. गोव्यातील दोन तृतीयांश पेक्षा जास्त काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला आहे.मागील वर्षीही गोव्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला हता, त्यावेळी काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. गोवा विधानसभेतील 11 पैकी 8 आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, दिलायला लोबो, भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे भाजपचे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.

 

काँग्रेसमधून फुटलेले आमदार
1. विरोधी पक्षनेते आमदार मायकल लोबो
2. आमदार दिगंबर कामात
3. आमदार आलेक स्वीकवेरा
4. आमदार दिलाईबा लोबो
5. आमदार केदार नाईक
6. आमदार रुडॉल्फ फर्नाडिस
7. आमदार राजेश सरदेसाई
8. आमदार संकल्प अमोनकर

error: Content is protected !!