सेलूत “ए वतन तेरे लिए ” कार्यक्रमात देशभक्तीचा गजर

0 144

 

सेलू ( नारायण पाटील ) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त नगर परिषद ,व्यापारी असोसिएशन ,इंडस्ट्रीयल ऑनर्स व यात्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही कलाकार ” प्रस्तुत “ए वतन तेरे लिए ” या कार्यक्रमात गायिलेल्या देशभक्तीपर गीतांनी अक्षरशः प्रेक्षकांचे डोळे देखील पाणावले होते .
१६ औगस्ट रोजी रात्री येथील साई नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार ,तहसीलदार दिनेश झापंले ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे ,जी प सदस्य अशोकराव काकडे ,
शिवसेना शहरप्रमुख मनीष कदम,प्रसिद्ध उद्योजक गोपाल काबरा,निलेश बिनायके ,रमेश काकडे ,जगदीश शर्मा आदींची उपस्थिती होती .
मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भागीरथ गेना यांचा यावेळी गौरव करण्यात आला .
या कार्यकर्मात दिपक देवा ,शिरीष संघई ,सुरेंद्र दिशागत ,सच्चिदानंद डाखोरे ,लक्ष्मीकांत दिग्रसकर ,पूजा तोडकर ,अनघा पांडे ,सतीश ताठे व विषेश निमंत्रित असलेले प्रशांत पाईकराव व पोर्णिमा कांबळे यांनी एकापेक्षा एक सरस अशी देशभक्तीपर गीते सादर केली .गीतातील सैनिकांच्या बलिदानाचे बोल ऐकुन प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात पाणी येत होते .
यावेळी सह गायक म्हणून मधुरा डासाळकर ,वैष्णवी पिंपळगावकर ,अनुष्का हिवाळे ,उज्जेनी संघई ,वैष्णवी देशपांडे ,वीणा बिनायके व प्रेरणा लिपणे यांनी साथ दिली .
या कार्यक्रमासाठी सुरेख अशी संगीत साथ त्यांच्या विविध उपकरणाद्वारे नईम शेख गिरीश दिक्षित ,रतन चिते,तेजस नानोटे ,पंकज लांडगे व विनोद राणे यांनी दिली .
कार्यक्रमाचे अगदी लयबद्ध सूत्र संचलन जयश्री सोनैकर व अशोक जैस्वाल यांनी केले .तर सुरेंद्र दिशागत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र मुळावेकर ,बाळकृष्ण हेलसकर व चंद्रहास पटेल यांनी केले होते .यावेळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी ,महिला व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती .
सामूहिक “वंदे मातरम “गीताने कार्यक्रमाची सांगता झाली

error: Content is protected !!