कुत्र्याला अमानुषपणे ठार मारणाऱ्यावर गुन्हा दाखल,निसर्गसाथी फाउंडेशनची पोलिसांत तक्रार

0 33

हिंगणघाट,दि 01 (प्रतिनिधी)ः 
हिंगणघाट शहरातील तेलीपुरा चौक टिळक वार्ड निवासी दिपक हेडाऊ,गोलू हेडाऊ, आशिष हेडाऊ यांनी कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करुन त्याची धिंड काढली. सदर घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. याची दखल निसर्गसाथी फाउंडेशन नी घेऊन घटनेची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात केली. कुत्र्याला अमानुषपणे ठार करणारयांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा १९६० अंतर्गत कलम ११(१)( ड) अन्वये गुन्हा नोंदवला गेला आहे.
निसर्गसाथी फाउंडेशन शहरातील पशु, पक्षी, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळ संवर्धनासाठी कार्यरत असून. पशु, पक्षांच्या संवर्धनासाठी मोलाचे कार्य करीत आहे. शहरात कुत्र्याला अमानुष पणे ठार मारून त्याची धिंढ काढल्याचा व व्हायरल झालेला व्हिडिओ निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडु यांचे निदर्शनास येताच त्यांनी सदर घटनेची दखल घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशन ला धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार देण्यात आली या तक्रारीची पोलीस विभागाने तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला .अशा प्रकारे हिंगणघाट मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार देउन गुन्हा दाखल करणारी शहरातील निसर्गसाथी फाउंडेशन ही पहिली संस्था आहे.
शहरात नियंत्रित प्रजनन केंद्रातून मोठ्या प्रमाणात विदेशी कुत्रे येत आहे . नागपूर ला खूप वेगवेगळ्या जातीचे विदेशी कुत्रे विकत मिळतात ही कुत्रे गावात येऊन कुत्र्यांची संख्या वाढत आहे देशी कुत्रे गुणवान असून सुध्दा उपेक्षित आहे. त्या मुळे मोकाट फिरत आहे. न.पा.हिंगणघाट तर्फे चार हजार कुत्र्यांची नसबंदी करून या मोकाट कुत्र्याच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवून शहराचे पर्यावरण स्वच्छ ठेवावे तसेच शहरात बाहेरून होणारी कुत्र्यांची आयात थांबवावी अशी मागणी सुध्दा निसर्गसाथी फाऊंडेशन तर्फे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!