जबरदस्तीने पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग, आरोपी सीसीटीव्हीत कैद

दोन अज्ञात आरोपीच्या विरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल

0 1,388

 

 

सेलू, प्रतिनिधी – येथील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मोटारसायकल वर पळवून नेऊन कोक शिवारात अतीप्रसंग केल्याची घटना दि ५ /९/२२ सोमवार रोजी घडली आहे. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपीच्या विरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

परभणीचे पोलीस अधीक्षकानी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपास कामी मार्गदर्शन केले आहे . या प्रकरणी पुढील तपास पी एस आय भाग्यश्री पुरी करीत आहेत.

या प्रकरणी माहिती अशी की, यातील १० वर्षाची पीडित मुलगी व तिचा १० वर्षाचा मावसभाऊ हे दोघे दिसू५/९/२२ सोमवार रोजी दुपारी साडे अकराच्या सुमारास सेलू – मंठा रोडवरील खाणीच्या मारोती समोरून शहरात येत होते .याचवेळी मोटार सायकलवरील दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करून त्या दोघांना जबरदस्तीने मोटारसायकल वर बसवून पळून नेले.

 

आरोपींनी मुलीच्या भावाला वालुर – बोरी रस्त्यावर कौसडी फाट्यावर सोडले व मुलीला घेऊन पुढे गेले .व कोक शिवारात मुलीवर दोन्ही आरोपींनी अतीप्रसंग केला.

 

 

सदरील घटना मुलीच्या भावाने नातेवाईकांना दिल्यानंतर मुलीच्या आईने ताबडतोब सेलू पोलीस स्टेशन गाठले व फिर्याद दाखल केली .सदरील फिर्यादीवरून सेलू पोलिसात दोन अज्ञात आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 

सदरील घटनेमुळे शहरात मात्र खळबळ उडाली असून पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

error: Content is protected !!