चंगळवाद नावाच्या राक्षसाच्या बिमोडासाठी एक पाऊल वाचनसंस्कृतीकडे-डॉ.पवन चांडक

वर्षभरात 52 पुस्तकांचे वाचन पूर्ण

0 191

कोविड, लॉकडाऊन नंतर बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या, कदाचित तात्पुरती का असेना त्या वेळी एक डॉक्टर म्हणून ऑनलाइन राहून आम्हाला बाहेर गावी असणाऱ्या रुग्णांना ऑनलाइन होमिओपॅथिक उपचार व consultation देणे ती त्यावेळची गरज होती. तसेच एक सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यासाठी फंड रेझिंग साठी सोशल मीडियावर आवाहन व वेळोवेळी होणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे updates सोशल मीडियाद्वारे ब्रॉडकास्ट/प्रसारित करावे लागते. नक्कीच दात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. परंतु कसे आहे सोशल मिडिया हे एक महाजाल आहे जसे फेसबुक/व्हाट्सअप्प वर किती वेळ आपण स्क्रोल करतोय ते मला लक्षातच यायचे नाही. नेहमीच माझी माझे मोठे बंधू शिवा आयथळ सरांसोबत चर्चा व्हायची की कामासाठी सोशल मिडिया च्या वापर व्यतिरिक्त फेसबुक watch वर व्हिडिओ, timeline scrolling, Cycling Group वर सायकलिंग, किमी चे अपडेट्स पाहण्यात कळायचे नाही की किती वेळ जातोय. शिवाय सध्या चालणारे विविध ऑनलाइन न्यूज अँप ते पण अखेर तेच वेळखाऊ प्रकार.

अर्थात चंगळवाद नुसता फोफावत चालला होता ज्यामुळे मी माझ्या जीवनातील महत्वाचा वेळ या स्क्रोल्लिंग मध्ये वाया घालत होतो.
अशा वेळी माझे बंधू प्रा शिवा आयथळ सरांनी मला वाचनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. लॉकडाऊन पूर्वी बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवछत्रपती वाचले होते पण 4 महिन्यांचा खंड नंतर जुलै मध्ये पुनः श्रीगणेशा केला. ‘Walden’ पुस्तक वाचतांना पुन्हा वाचनाची आवड निर्माण होत गेली आणि मग साधी राहणी, कमीत कमी गरजांमध्ये जीवनशैली ठेवत सहज, सोप्पे कमी खर्चात आपण जगू शकतो हा संदेश मिळाला. आणि इथून पुढे सुधा मूर्ती लिखित पुस्तके वाचत जसे ‘आयुष्याचे धडे गिरवताना’ मी स्वतः वाचनाचे धडे गिरवू लागलो अर्थात वाचनाची आवड निर्माण झाली.
बघता बघता सुधा मूर्ती लिखित सर्व च्या सर्व 22 पुस्तके वाचून झाली.
वाचनवेडा ग्रुप वर मी वाचलेल्या पुस्तकावर समीक्षण/परिचय लिहायला लागलो. सोबत विविध पुस्तकांविषयी माहिती मिळत गेली.

वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी झटणारे माझे मित्र प्रा विनोद शेंडगे सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. शिवा आयथळ सर व शेंडगे सरांसोबत पुस्तकांविषयी चर्चा व्हायची ज्यातून सामाजिक विषयांव्यतिरिक्त विज्ञान, मानसशास्त्र विषयक पुस्तक विषयी माहिती मिळाली.
ज्यातून रॉल्फ डोबेली यांचे ‘आर्ट ऑफ थिंकिंग क्लीयरली’, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग गुड लाईफ’, ‘स्टॉप रिडींग द न्यूज’ आदींमुळे माझ्यात आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. ही पुस्तके नेहमीच माझ्या टेबलवर असतात आणि जेंव्हा इच्छा होईल तेंव्हा त्यातील 1 chapter मी वाचत असतो.
बाल साहित्यिक गणेश आयथळ पासून प्रेरणा घेऊन आर के नारायण लिखित मालगुडी डेज पासून सर्वच पुस्तके वाचून काढली. प्रत्येक पुस्तके वाचतांना एक वेगळा अनुभव घेता आला.
बघता बघता 1 वर्ष झाले. जुलै पासून आज 30 डिसेंबर दरम्यान तब्बल 52 पुस्तके वाचून झाली.

पुष्कळ बाल साहित्य जसे चिंटू, माधुरी पुरंदरे लिखित पुस्तके, ज्योत्स्ना प्रकाशन नॅशनल बुक ट्रस्ट, प्रथम बुक्स ची अनेक पुस्तके माझ्या मुलींना वाचून दाखवत असतो. त्यामुळे माझ्या मुलींचा मोबाईल वरील स्क्रीन टाईम 20 मिनिटांवर आला.

एकंदर प्रा शिवा आयथळ, गणेश आयथळ व प्रा विनोद शेंडगे सरांमुळे मला माझ्यातील चंगळवाद वर मात करण्यासाठी वाचन संस्कृती चा फार मोठा आधार मिळाला आहे. येणाऱ्या दिवसांत स्लो पण अर्थपूर्ण वाचनावर भर राहील.
सध्या नुकतेच वाचनसंस्कार होत आहेत.

अजून आहे पुढे जायचे……

डॉ पवन चांडक
9422924861
वाचक

error: Content is protected !!