सशक्त पिढीच समाज घडवते-डॉ.अश्वमेध जगताप

0 45

नारायण पाटील
 सेलू,दि 26 ः
विद्यार्थ्यानो, तुमच्यातील क्षमता ओळखा. तुम्हाला जे बनायचंय ते ठरवा. तुमची आवड, वेड बघा आणि त्यातील करिअर करा. यश नक्की मिळते. एक सकशक्त पिढीच सशक्त समाज घडवित असते, हे कायम लक्षात ठेवा, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा जालना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अश्वमेध जगताप यांनी येथे केले.

नूतन विद्यालयाचे स्नेहसंमेलन मंगळवारी ( २४ जानेवारी ) उत्साहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. या वेळी संस्था सदस्य दत्तराव पावडे, नंदकिशोर बाहेती, राजेश गुप्ता, उद्योजक कृष्णा भानुसे, मुख्याध्यापक नारायण सोळंके, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सुरेखा खिल्लारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.जगताप यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, ” सर्व गोष्टी कधीच अनुकूल नसतात. त्यामुळे आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंग सारख्या त्याच त्याच वाटा शोधू नयेत. अन्य विविध क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यादृष्टीने आवड जपून करिअर निवडणे गरजेचे आहे.पालकांनीही पाल्याच्या क्षमता ओळखून भविष्याला दिशा देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.”

दत्तराव पावडे म्हणाले, ” ‘नूतन’ चे अनेक विद्यार्थी देश, विदेशात विविध क्षेत्रात पुढे आहेत. ‘नूतन’ चा विद्यार्थी म्हटले की त्याला आजही सन्मानाने वागणूक दिली जाते. निश्चय करा. ध्येय बाळगा. मोठं व्हायचं असेल, आयुष्य सुखी करायचे असेल, तर शिक्षकाला देव माना, आदर्श व्यक्तीचे चरित्र अभ्यासा आणि मन लावून अभ्यास करा.” प्राचार्य डॉ.कोठेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वेशभूषेतील यज्ञेश देवढे व दीपक वरकड या विद्यार्थ्याच्या बासरी वादनाने लक्ष वेधले. स्काऊट व गाईडस् विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रारंभी श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, मानसी दलाल, समृध्दी राखे, वीणा बिनायके, दिशा जोशी यांनी गायलेल्या मराठवाडा गौरव गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पाहुण्याचा परिचय अथर्व दिग्रसकर याने दिला. या वेळी विविध शालेय स्पर्धा परीक्षा, रंगभरण स्पर्धा तसेच स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील एकूण ८७९ विजेत्यांचे ; तसेच पाच राष्ट्रीय, ४४ राज्य खेळाडू यांच्यासह उत्कृष्ट खेळाडू मह्णून श्रृष्टी कैलास सोळंके व आर्यन रामभाऊ गायके यांचे प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी केले. उपमुख्याध्यापक संतोष पाटील यांनी अहवाल सादर केला. सूत्रसंचालन साक्षी मैड, गौरी सोनी, तर पल्लवी गजमल या विद्यार्थिनीने आभार मानले. पर्यवेक्षक के.के. देशपांडे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, सतीश नावाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख काशिनाथ पल्लेवाड, सुरेश हिवाळे, अतुल पाटील, निशा पाटील, अशोक लिंबेकर, शैलजा कवुटकर, पी.टी.कपाटे, उज्ज्वला लड्डा, सुनीता सांगुळे, बाबासाहेब हेलसकर, संतोष मलसटवाड, भगवान देवकते, आर.डी.कटारे, फुलसिंग गावीत, बन्सीलाल पद्मावत, प्रशांत नाईक, सुधीर जोशी, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे, मयुरी जैस्वाल, विशाल क्षीरसागर, केशव डहाळे, अरूण रामपूरकर, गोरखनाथ घायाळ, सोशल मिडिया टीम तंत्रज्ञ प्रदीप कचरु वाघ, अप्पासाहेब चिंचपुरे, अमोल कंडारे, रोहन भावसार, शिव वाळेकर, संदीप भगवान मिसाळ आदींसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला पालक शिक्षक संघ, परिवहन समिती सदस्य, सतीश जाधव, गिरीश लोडाया, कैलास सोळंके, रामभाऊ गायके आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

error: Content is protected !!